शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कमबॅक हा सेटबॅकपेक्षा शक्तिशाली; मनसे नेते बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:10 IST

२० व्या गुढीपाडवा मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती 

मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठी माणूस, राज्यावर प्रेम करणारा एकमेव नेता आणि  राजकारणाचा धुरंधर एकच आहे, तो म्हणजे राज ठाकरे, असे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी  व्यक्त केले.

मनसेचा २०वा गुढीपाडवा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी तुम्ही संयम बाळगलात आणि तुमचे कम बॅक होणार. कम बॅक हा सेट बॅकपेक्षा खूप शक्तिशाली असतो, असे ते म्हणाले.

दप्तराचे ओझे कमी कराराज ठाकरे यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. सत्ता कोणाचीही असली तरी सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच, ते म्हणजे राज ठाकरे, असे सांगत, येणारा काळ १०० टक्के राज ठाकरे यांचा आहे, असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी  मुलांच्या दप्तराच्या ओझ्याचा विषय मांडताना हे ओझे कमी करण्याची मागणी केली. प्रिंटर लॉबीच्या दबावामुळे ओझे मुलांना सोसावे लागत आहे, असा आरोपही केला. राजकारणाची बजबजपुरी झाल्याने तरुणांनी याकडे पाठ फिरवली, असे मत मनोज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कर्णावतीनगर कधी होणार? २० वर्षांपूर्वी मेळावा या मैदानात बसून ऐकत होतो. आज या व्यासपीठावर भाषण करत आहे, हे फक्त राज ठाकरे हेच करू शकतात, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्राला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण केले, अहमदनगरचे अहिल्यानगर केले, असे सांगून अहमदाबादचे कर्णावतीनगर कधी होणार ? असा सवाल त्यांनी केला.

विदर्भातून ७ हजार कार्यकर्ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले होते. सुमारे ७ हजार कार्यकर्ते विदर्भातून आले होते. 

सभास्थळाची क्षणचित्रेसभास्थळी येणाऱ्या चौकात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देणारे अनेक बॅनर्स लागले होते. मात्र, त्यातील एक बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. ‘१९ मार्च २००६ - स्वतःला महाराष्ट्राला अर्पण...१९ मार्च २०२६ - हा नुसता योगायोग नाही, तर हा इतिहासाच्या नियतीचा संकेत आहे’, असे त्यावर लिहिले होते. मनसेची पक्ष स्थापनेनंतरची पहिली जाहीर सभा याच मैदानात १९ मार्च २००६ या दिवशी झाली होती. त्यानंतर दरवर्षी गुढी पाडव्याला वेगवेगळ्या तारखेला ही सभा होते. आज योगायोगाने पहिल्या सभेची तारीख आणि आजचा गुढी पाडवा १९ मार्च, हा योगायोग जुळून आला आहे. 

मेळाव्यासाठीच्या व्यासपीठ पूर्णपणे झेंडूच्या फुलांनी सजवलेले होते, तर दोन्ही बाजूला  प्रतिकात्मक भव्य गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Comeback more powerful than setback: MNS leader Bala Nandgaonkar

Web Summary : MNS leader Bala Nandgaonkar praised Raj Thackeray, highlighting his leadership. At the Gudi Padwa rally, MNS leaders emphasized Thackeray's unwavering principles and predicted his future success. Issues like reducing the burden of school bags and renaming Ahmedabad to Karnavati were also raised.
टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसे