शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:42 IST

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.

मुंबई : ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेनुसार राज्यातील कोविडमुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय शिक्षण विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समिती आणि पालकांचा ठराव होऊन मान्यता मिळणे आवश्यक आहे.शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली सात सदस्यीय समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करून पार पाडावी, अशा सूचनाही आहेत. शाळा सुरू झाल्यावर शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांच्या अलगीकरणाचे नियोजन, तसेच शाळा काही दिवसांसाठी बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठीचा आराखडा शाळेने तयार करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरी भागांतील शाळांबाबत संभ्रमग्रामीण भागातील शाळांसाठी ठराव कोणी करावा यासंदर्भात सूचना आहेत. मात्र, शहरी भागात ही जबाबदारी कोणाची असेल याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त ग्रामीण भागातील शाळाच सुरू करायच्या का, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक विचारत आहेत.

शाळा सुरू करताना महत्त्वाचे निकष- शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी- शाळेतील स्नेहसंमेलन, परिपाठावर कडक निर्बंध- शिक्षक, विद्यार्थी यांची दैनंदिन थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य

अकोल्यातील कापशी गावात साेमवारपासून शाळा- सरकारी निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. - साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे. येथे सर्वप्रथम इयत्ता आठवी, नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीTeacherशिक्षक