शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

पुढल्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:33 IST

गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी (दि.१२) गणरायाचे विधिवत विसर्जन करून गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीनिमित्ताने शेकडो गणेशभक्तांनी तपोवन, गोदापार्क, रामकुंड, तसेच गंगाघाटावर गणरायाचे विधिवत पूजन केले.

पंचवटी : गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी (दि.१२) गणरायाचे विधिवत विसर्जन करून गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीनिमित्ताने शेकडो गणेशभक्तांनी तपोवन, गोदापार्क, रामकुंड, तसेच गंगाघाटावर गणरायाचे विधिवत पूजन केले.गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाल्यानंतरदेखील भाविकांचा उत्साह कायम होता. नदीपात्र परिसरात आल्यानंतर गणपतीचे विधिवत पूजन व आरती करून बाप्पांना मोदक खिरापत नैवेद्य दाखवत भक्तांनी गणेशमूर्तीचे नदीपात्रात विसर्जन केले, तर काहींनी पर्यावरणपूरक विसर्जन केले. ज्या भाविकांनी मूर्तिदान करायची आहे. त्यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने संपूर्ण गंगाघाट, तपोवन, आडगाव, म्हसरूळ, पेठरोड, मेरी, सरस्वतीनगर, परिसरात मूर्ती संकलन केंद्र उभारलेले होते. भाविकांनी नदीपात्रात मूर्ती बुडविल्यानंतर त्या मूर्ती महापालिका प्रशासनाने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांनी मूर्तिदान करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. संध्याकाळी मालेगाव स्टँड येथे पंचवटी शांतता समितीतर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. पंचवटीतील सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळ, गजानन चौक मित्रमंडळ, सत्यबाल मित्रमंडळ, मानेनगर फ्रेंड सर्कल, यंग स्टारमित्र मंडळ, अचानक मित्रमंडळ, सरदारचौक मित्रमंडळ, कैलास युवक मित्रमंडळ, भगवती कला मित्रमंडळ, मालवीय चौक मित्रमंडळ, गुरुदत्त सामाजिक कला, क्र ीडामंडळ, नवीन आडगाव नाका मित्रमंडळ, दुर्गा फ्रेंड सर्कल, संजयनगर मित्रमंडळ, मालेगाव स्टँड मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, नागचौक मित्रमंडळ, तारवालानगर मित्रमंडळ, शंभुराजे फ्रेंड सर्कल आदींसह भागातील मित्रमंडळांनी गणरायाचे विधिवत विसर्जन केले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक