बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी

By कुणाल गवाणकर | Published: October 28, 2020 03:22 PM2020-10-28T15:22:05+5:302020-10-28T15:25:24+5:30

जान कुमार सानूच्या विधानाविरोधात शिवसेना, मनसेनं घेतली होती आक्रमक भूमिका

Colors apologizes to CM Uddhav Thackeray for jaan kumar sanu statement about marathi | बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी

बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी

Next

मुंबई: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानूविरोधात मनसे, शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या 'कलर्स' वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्यानं आम्ही माफी मागतो, असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. तर शिवसेनेनं जानची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यानंतर कलर्सनं मुख्यमंत्र्यानी पत्र लिहून माफी मागितली.



'२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषणांचा आम्ही सन्मान करतो,' असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मनसेची आक्रमक भूमिका; जान कुमार सानूला थेट इशारा
'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी,' असा थेट इशारा खोपकर यांनी दिला आहे. 'कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,' असं खोपकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे. 

कोण आहे जान कुमार सानू?
जान कुमार सानूचं मूळ नाव जयेश भट्टाचार्य आहे. तो प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. संगीत क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायचं असल्यानं मी माझ्या नावापुढे त्याचं नाव लावतो, असं जाननं टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. 
 

Web Title: Colors apologizes to CM Uddhav Thackeray for jaan kumar sanu statement about marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.