एसटीत टवाळखोरी करणार्या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप
By Admin | Updated: August 4, 2016 23:00 IST2016-08-04T23:00:13+5:302016-08-04T23:00:13+5:30
तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून

एसटीत टवाळखोरी करणार्या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप
ऑनलाइन लोकमत
रावेर, दि. ४ - तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून परतलेल्या रावेर बस फेरीतील त्या अटवाडे येथील दोघा वाळखोरांना दुर्गावतार धारण केलेल्या खानापूरच्या युवतींनी खाली उतरवून चक्क चपलांनी चोप दिल्याने एकच खळबळ उडाली. खानापूर बसथांब्यावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रावेर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासाठी खानापूर येथून नियमीत ये - जा करणाऱ्या विद्यार्थीनींची मंगळवारला सायंकाळी परतीच्या प्रवासातील रावेर - अटवाडे एस टी बसमध्ये अटवाडे येथील काही महाविद्यालयातील व काही टवाळखोर अशा ४ युवकांनी टिंगलटवाळी व शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी दुर्गावतार धारण केलेल्या विद्यार्थींनींनी आज अटवाडे येथून परतलेल्या बसमध्ये त्या चौघांपैकी दोन टवाळखोर दिसताच त्यांना बसच्याखाली खेचून चपलांनी बदडत यथेच्छ धुलाई केली. ही घटना आज खानापूर बसथांब्यावर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, रावेर पोलीसांना घटनास्थळी बोलावून दोघे टवाळखोरांच्या साथीदारांनाही पोलीस ठाण्यात हजर करा अन्यथा बसचा चक्काजाम करतो असा इशारा संतप्त युवतींनी दिला. युवतींनी त्या टवाळखोर युवकांना बसद्वारे थेट रावेरला पोलीस ठाण्यात नेले. त्या चौघांनाही हजर करून त्यांची व त्यांचे पालकांची पोलीसांनी कानउघाडणी करून समज दिली.