थंडीचे कमबॅक; तापमान ४ अंशांनी घटले; दहा दिवस गारठा टिकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:40 IST2024-12-09T06:40:34+5:302024-12-09T06:40:45+5:30

'फेंगल' चक्रीवादळाने अडवले होते गार वारे

Cold's Comeback; The temperature dropped by 4 degrees; Garatha will last for ten days  | थंडीचे कमबॅक; तापमान ४ अंशांनी घटले; दहा दिवस गारठा टिकणार 

थंडीचे कमबॅक; तापमान ४ अंशांनी घटले; दहा दिवस गारठा टिकणार 

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. थंडी आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. 

गेल्या काही दिवसांत 'फेंगल' चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील थंडी चांगलीच वाढवली होती; पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली; पण आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंझावात) वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. 

पुण्यात थंडी वाढली ! 
गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे २० अंशांच्या जवळपास होते. त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून खान्देश, नाशिकपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार, दि.१८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लासह बहुतेक भागात जोरदार हिमवृष्टी होऊ लागली आहे. 

नाशिककरांना पुन्हा हुडहुडी एकाच दिवसात पारा ४ अंशांनी घसरून १२.५ वर आला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. शनिवारी किमान तापमान १६.६ अंशावर होते. पहाटे धुके पसरलेले दिसून आले. धुळ्याचे तापमान ९.५ अंशांवर गेल्या आठ दिवसांपासून कमी झालेला थंडीचा जोर रविवार अचानक वाढला. 
धुळ्याच्या शहराच्या तापमानाचा पारा ९.५ अंशांवर आल्याची माहिती कृषी महाविद्यालयातर्फे देण्यात आली. 

नागपुरात पारा हळूहळू घसरतोय 
फेंगल चक्रीवादळाचे सावट ओसरले असले तरी ढगाळ वातावरण नागपूरसह विदर्भात कायम आहे. ही स्थिती दोन दिवस कायम राहील, तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीही शक्यता आहे.

Web Title: Cold's Comeback; The temperature dropped by 4 degrees; Garatha will last for ten days 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.