शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दिवाळीमध्ये बोचऱ्या थंडीचा कडाका होणार कमी; हवामान विभागाचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 21:08 IST

राज्यात बुधवारी सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

ठळक मुद्दे१६ नोव्हेंबरला दक्षिण पूर्व भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता

पुणे : विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून सर्व राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील २ दिवस तापमानात हळू हळू वाढ होऊ लागणार असून दिवाळीत थंडीचा असर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात बुधवारी सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या उत्तर पूर्वेकडून हवा दक्षिणेच्या दिशेने वाहत असल्याने उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत असल्याने हवामानात मोठी घट झाली आहे. ही परिस्थिती थंड हवेच्या लाटेच्या जवळपास जाणारी आहे.परभणीत सरासरीपेक्षा ७.५ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे. त्याचबरोबर सोलापूरला ५.८, गोंदिया येथे ६ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे. १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात १२ ते १४ अंश सेल्सिअस, कोकण १८ ते २० अंश सेल्सिअस, मराठवाडा १३ ते १४ अंश सेल्सिअस आणि विदर्भात १२ ते १४ अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी १६ नोव्हेंबरला दक्षिण पूर्व भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आर्द्रता वाढून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे......

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)पुणे १०.६, लोहगाव १२.४, जळगाव ११.६, कोल्हापूर १५.२, महाबळेश्वर १२.२, मालेगाव १२.६, नाशिक १०.६, सांगली १३.३, सातारा १२.६, सोलापूर १२.९, मुंबई २२, सांताक्रुझ १९.४, रत्नागिरी १७.३, पणजी १९.३, डहाणु १९, औरंगाबाद १२, परभणी ९.९, नांदेड १३.५, बीड १५.६, अकोला १२.४, अमरावती १२.७, बुलढाणा १३.२, ब्रम्हपुरी १४.५, चंद्रपूर ११.८, गोंदिया ११.४, नागपूर १२.२, वशिम १२, वर्धा १३. 

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDiwaliदिवाळी