शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

थंडीने महाराष्ट्र गारठला; नागपूर ५, मुंबई २० अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 1:55 AM

काही भागांत उल्लेखनीय वाढ

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या थंडीने शनिवारी मात्र महाराष्ट्र गारठला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, विदर्भातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १० अंशांखाली घसरले आहे. दुसरीकडे मुंबई मात्र अद्यापही थंडीच्या प्रतीक्षेत असून, येथे म्हणावा तसा गारठा पडलेला नाही. शनिवारी मुंबईचे किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, रविवारसह सोमवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.दिवाळीत थंडीची चाहूल लागते. पण यंदा दिवाळी सरली, जुने वर्ष संपत आले तरी थंडीचा महिना काही यायला तयार नव्हता. पण गेले दोन दिवस महाराष्टÑ काहीसा गारठू लागला आहे. त्यामुळे वर्षअखेर का होईना आला थंडीचा महिना असे चित्र राज्यात आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे; उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे.राज्यातील शहरांचे शनिवारचेकिमान तापमान (अंश सेल्सिअस)नागपूर ५.१गोंदिया ५.२चंद्रपूर ५.४ब्रह्मपुरी ६.९वर्धा ७.५अकोला ८.७यवतमाळ ९अमरावती ९.२बुलडाणा ९.५जळगाव १०.५औरंगाबाद १०.९वाशिम ११.२परभणी ११.३नाशिक ११.४मालेगाव ११.६नांदेड १४.५महाबळेश्वर १५पुणे १८.३डहाणू १८.५सोलापूर १९कोल्हापूर १९.७सातारा १९.७सांगली २०.१मुंबई २०.४अलिबाग २०.७२९ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंड दिवस राहील. काही ठिकाणी थंडीची लाट येईल. ३१ डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.