शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

गारठ्याने तिघांचा बळी, विदर्भात येणार थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:26 AM

पुणे : नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होत असतानाच राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

पुणे : नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होत असतानाच राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गारठ्याने बुधवारी लातूर जिल्ह्यात शेतमजुराचा तर कोल्हापूरात दोघा फिरस्त्यांचा मृत्यू झाला. विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर येथे ७़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़मराठवाडा, विदर्भातील किमान तापमान सातत्याने घटत असून लातूर जिल्ह्यात थंडीने शेतमजूराचा बळी गेला. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर पंजाब, उत्तर राजस्थान, कच्छ, मश्चिम मध्य प्रदेश या भागात थंडीची लाट असून त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यावर झाला आहे.राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) - पुणे १०़८, जळगाव ९, कोल्हापूर १६़१, महाबळेश्वर १२, मालेगाव १०़५, नाशिक ८़२, सांगली १४़१, सातारा १२़३, मुंबई २१़२, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १८़४, रत्नागिरी २०़३, पणजी १९़५़ डहाणू १६़८, भिरा १९़५, उस्मानाबाद ८़६, औरंगाबाद १०़१.तिघांचा बळी - लातूर जिल्ह्यात दयानंद यादव भालेराव (४३, रा. डोंगरगाव, ता. निलंगा) या शेतमजुराचा थंडीने गारठून मृत्यू झाला. औराद शहाजानी व तेरणा काठावरील परिसरात थंडीचा कडाका वाढला असून पारा ८ अंशांपर्यंत खाली आला आहे. कोल्हापूरात एक महिलेसह दोघा फिरस्त्यांचा थंडीने बळी घेतला. दस्तगीर नियाम नदाफ (वय ५० रा. रजपूतवाडी) असे एकाचे नाव असून महिलेची ओळख पटलेली नाही.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू