शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

किनवट पालिका भाजपाच्या ताब्यात, राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावली, शिवसेनेला भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:18 IST

किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा कमी मिळाल्या आणिा सत्ताही गमवावी लागली.

किनवट (जि़ नांदेड) : किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा कमी मिळाल्या आणिा सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही़ विसर्जित पालिकेत भाजपचा एकही नगरसेवक नव्हता, हे विशेष़१३ डिसेंबर रोजी पालिकेसाठी मतदान झाले होते़ १४ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली़ यात भाजपाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत ९ जागा पटकाविल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसने ६, काँग्रेसने २ तर एका अपक्षाने बाजी मारली़भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद मच्छेवार यांनी काँग्रेसचे शेख चाँदसाब रतनजी यांचा पराभव केला़ मच्छेवार यांना ६ हजार ३५८ तर शेख चाँदसाब यांना ४ हजार ५४७ मते मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर हबीबोद्दीन चव्हाण यांनी २ हजार ९८१, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रवीण राठोड यांना २ हजार ७४८, शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १ हजार ३०२ मते मिळाली़फुलंब्रीतही कमळ फुललेफुलंब्री (जि. औरंगाबाद) : फुलंब्री येथील प्रतिष्ठेच्या पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा १९० मतांनी पराभव केला. शिवाय १७ पैकी ११ नगरसेवकही भाजपचेच विजयी झाले. शहर विकास आघाडीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएमला या निवडणुकीत एक जागा मिळाली. नगर पंचायतसाठी बुधवारी मतदान झाले. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. भाजप पॅनलच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केली होती. परंतु मतदारांनी या आघाडीला धूळ चारली.जिंतुरात राष्ट्रवादी विजयीजिंतूर (जि. परभणी) : येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार परवीन तहजीब जानीमियाँ या ७९६ मतांनी विजयी झाल्या. १० वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील एका रिक्त जागेसाठी बुधवारी ६४.६४ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी शहरातील नगरपालिकेच्या सभागृहात मतमोजणी झाली. यात परवीन तहजीब जानीमियाँ यांना १ हजार २५१ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार शहाजीया बेगम रफीक यांना ४५५ मते मिळाली.हुपरी नगराध्यक्षपदी भाजपाच्या गाटहुपरी (जि. कोल्हापूर) : हुपरी (ता. हातकणंगले) नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाच्या जयश्री महावीर गाट यांनी नगराध्यक्षपदावर २,०५७ मतांच्या फरकाने निर्विवाद विजय मिळवला. नगर परिषदेच्या १८ जागांपैकी भाजपाला ७, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीला ५, शिवसेना २, मनसे प्रणीत अंबाबाई विकास आघाडीला २ व अपक्ष २ (शिवप्रतिष्ठान संघटनेचे) असे नूतन सभागृहात पक्षीय बलाबल झाले आहे. या पहिल्याच निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही़

टॅग्स :BJPभाजपा