शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ही खुर्ची तुमची आहे; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रेमळ आदेशाची जिल्ह्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 16:50 IST

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आदरामुळे तहसीलदार भारावले

सांगली:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका कृतीची सध्या सांगलीत जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी इस्लामपूरमधल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे आले होते. उद्घाटन केल्यानंतर उद्धव यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली. तळमजल्यावर असलेल्या तहसीलदारांच्या खुर्चीत मुख्यमंत्री काही वेळ बसले. मात्र लगेचच त्यांनी थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या तहसीलदारांना हाताला धरुन खुर्चीजवळ आणलं आणि त्यांना खुर्चीत बसवलं.दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वाळवा तहसील कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. फित कापून कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री व सर्व मान्यवर इमारतीमधल्या दालनांची पाहणी करू लागले. वरच्या मजल्यावरील बैठक सभागृह पाहून मुख्यमंत्री सर्वात शेवटी खालच्या मजल्यावरील तहसीलदारांच्या दालनापाशी आले. इमारतीमधलं प्रमुख कार्यालय असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आत जाऊन कार्यालयाची रचना पाहायला सुरुवात केली. यावेळी तहसीलदारांच्या कार्यालयात घडलेल्या एका प्रसंगाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तहसीलदारांच्या दालनात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री खुर्चीत बसले. काही वेळ बसल्यानंतर अचानक मुख्यमंत्री खुर्चीवरुन उठले आणि थोड्या दूरवर उभ्या असलेल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे गेले. त्यांनी सबनीस यांना हाताला पकडून खुर्चीजवळ आणलं आणि काही कळायच्या आत त्यांना फर्मावलं 'तुम्ही तहसीलदार आहात ना? मग ही खुर्ची तुमची आहे... बसा इथे.' अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सबनीस काहीसे गांगरले. जिल्हाधिकारी, मंत्री, राज्यमंत्री उपस्थित असल्यानं मी इथे बसू शकत नाही, असं नम्रपणे सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. सबनीस यांनी खुर्चीवर बसण्यास नम्रपणे नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना अतिशय प्रेमळ शब्दांत समजावलं. 'ही तुमची इमारत आहे. याठिकाणी तुम्ही प्रमुख म्हणून  काम पाहणार आहात. ही तुमची खुर्ची आहे. या खुर्चीवर माझ्या हस्ते तुम्हाला स्थानापन्न करायचं आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांना खुर्चीत बसण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांचा आग्रह पाहून सबनीस खुर्चीत बसले. 'या महत्वाच्या पदावर तुम्ही आहात. तुम्हाला मी स्वत: बसवलं आहे. त्यामुळे काम पण चोखपणेच करा', असं सांगून मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांची पाठ थोपटली.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या प्रेमळ वागणुकीनं रवींद्र सबनीस आश्चर्यचकीत झाले. 'मुख्यमंत्री उद्घाटन करून तिथून निघूनही गेले. पण तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा या नवीन दालनातल्या माझ्या खुर्चीवर बसतो, तेव्हा तेव्हा मला शेजारी राज्याचे मुख्यमंत्री उभे आहेत असा भास होतो,' असं रवींद्र सबनीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सन्मानामुळे आपली जबाबदारी आणखी वाढल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे