शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं; 'पुन्हा येईन'वरुन मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:31 PM

फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई: मी इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं. पण आयुष्य म्हणजे रंगभूमी आहे. इथं कधी कोणाला कोणती भूमिका करावी लागेल सांगता येत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'मी पुन्हा येईन' वरुन चिमटा काढला. यापुढे विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं मी म्हणेन. कारण विरोधकदेखील माझे मित्र आहेत. माझी आणि त्यांची मैत्री फार जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.देवेंद्र फडणवीस यांची आज विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली. यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजीदेखील केली. 'मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी असा पहिलाच मुख्यमंत्री आहे, ज्याच्या समोरचा विरोधी पक्ष त्याचा ३० वर्ष जुना मित्र आहे आणि सोबत असलेले सहकारी आतापर्यंतचे राजकीय विरोधक आहेत. विरोधी पक्षात बसलेल्यांना मी विरोधक समजत नाही. कारण ते माझे मित्रच आहेत. तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवली नाही आणि यापुढेही लपवणार नाही,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. काल मी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काय बोललो, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र बंद दाराआड आणि कानात काय बोललो ते सांगण्याची आमची संस्कृती नाही, असं म्हणत उद्धव यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांना टोला लगावला. विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारला सहकार्य कराल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता. मला इथं यावं लागलं नसतं. कारण इथे येईन असं मी कधीच म्हटलं नव्हतं, असा चिमटा उद्धव यांनी काढला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना