शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Uddhav Thackeray : चला यांना गाडीत टाकून शिवबंधन बांधू; मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या बड्या नेत्यांसाठी कार थांबवतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:49 IST

CM Uddhav Thackeray stopped his car for BJP leaders in assembly premises : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये विधिमंडळाच्या परिसरात हास्यविनोद

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनावरून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. कोरोनाचा बहाणा पुढे करून पावसाळी अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षनेते सरकारवर जोरदार हल्ला चढवत असताना विधिमंडळ परिसरात मात्र भाजपचे इतर नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये उत्तम संवाद पाहायला मिळाला. CM Uddhav Thackeray stopped his car for BJP leaders in assembly premisesसरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही, फडणवीसांचा इशारा

मुख्यमंत्री ठाकरे त्यांची गाडी चालवत विधिमंडळाच्या बाहेर निघाले होते. त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड विधिमंडळ परिसरात उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची कार थांबवली. त्यानंतर मागच्याच कारमध्ये असलेले शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर स्वत:च्या कारमधून उतरले आणि मुख्यमंत्र्यांच्या कारजवळ पोहोचले.शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

भाजप नेते, मुख्यमंत्री ठाकरे आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात यावेळी हास्यविनोद रंगला. ही मंडळी तुमची कार अडवत आहेत का, असं नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना हसत हसत विचारलं. त्यावर आम्हाला तसं करण्याची गरज नाही. आम्ही कधीही येऊ शकतो, असं दरेकर यांनी म्हटलं. 'यांना आताच गाडीत टाकू आणि शिवबंधन बांधू,' असं पुढे नार्वेकर यांनी गमतीनं म्हटलं. त्यावर आमचं मूळ तेच आहे. आम्ही कधीही येऊ शकतो, असं दरेकर म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील व्यक्तीगत सलोखा विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेलं पत्र समोर आलं असताना शिवसेना आणि भाजपमधील हा सलोखा पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. हे पत्र समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाडpravin darekarप्रवीण दरेकरGirish Mahajanगिरीश महाजन