शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:42 IST

तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी

नागपूर: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची ठाकरे सरकारकडून बदली करण्यात आली आहे. सध्या एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या मुंढेंची आता नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच मुंढेंची आयुक्तपदी वर्णी लावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आज सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुकाराम मुंढेंची भेट झाली होती. या भेटीत दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. याच भेटीनंतर मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. नागपूर महापालिकेतील राजकीय परिस्थिती पाहता मुंढेंची नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. महापालिकेत दणदणीत बहुमत असलेल्या भाजपाला शह देण्यासाठी मुंढेंना आयुक्तपद देण्यात आल्याचं बोललं जात आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपानं तब्बल १०८ जागा जिंकल्या आहेत. नागपूर महापालिकेत एकूण १५१ सदस्या आहेत. दोन वर्षात नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंढेंकडे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे अधिकारी अशी मुंढेंची ओळख आहे. मुंढे जिथे जातात, तिथे त्यांच्यात आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद होतो, हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेचं आयुक्तपद देण्यात आल्याची चर्चा आहे. 

याआधी डिसेंबर २०१८ मध्ये तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंढे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असतानादेखील मुंढेंनी धडाकेबाज कामगिरी केली होती. परिवहन सेवेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. अतिशय कर्तव्यकठोरपणे काम करत असल्यानं त्यांच्याविरोधात तक्रारीदेखील करण्यात आल्या. 

पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन मुंढेंची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. तिथेही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली. त्यामुळे सत्ताधारी आणि मुंढेंमध्ये संघर्ष टोकाला पोहोचला होता. तेथून २२ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंढेंची मुंबईत राज्याच्या नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली होती. मात्र महिना उलटण्यापूर्वीच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती.  

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे