मुख्यमंत्री सुस्साट! भर पावसात सपत्नीक पंढरपूरसाठी रवाना; उद्धव ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:57 PM2021-07-19T16:57:28+5:302021-07-19T16:57:42+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रस्तेमार्गानं पंढरपूरला रवाना; बाजूच्या सीटवर रश्मी ठाकरे

cm uddhav thackeray lefts mumbai for pandharpur with wife rashmi thackeray in heavy rain | मुख्यमंत्री सुस्साट! भर पावसात सपत्नीक पंढरपूरसाठी रवाना; उद्धव ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर

मुख्यमंत्री सुस्साट! भर पावसात सपत्नीक पंढरपूरसाठी रवाना; उद्धव ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर

googlenewsNext

मुंबई : आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे विमान प्रवास शक्य नसल्यानं मुख्यमंत्री रस्ते मार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत.

गेल्या वर्षीदेखील मुख्यमंत्री ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी मर्सिडिजनं पंढरपूर गाठलं होतं. आता मात्र मुख्यमंत्री रेंज रोव्हरनं पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. ही गाडी  आदित्य ठाकरे वापरत असतात. पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेल्या मर्सिडीजऐवजी आदित्य ठाकरेंच्या रेंज रोव्हरनं पंढरपूरकडे रवाना झाले. 

सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ९ च्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील. मुख्यमंत्री विमानानं मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होत., मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले.

मुंबई ते पंढरपूर या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री लोणावळ्याजवळ काही वेळ चहापानासाठी, विश्रांतीसाठी थांबण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पाऊस सुरु आहे. एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्यांचे पार्किंग लाईट्स ऑन करुन ड्रायव्हिंग केलं जात आहे.



पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी टीका केली आहे. 'तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला... वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री...', असा खोचक टोला उपाध्येंनी लगावला आहे.

Web Title: cm uddhav thackeray lefts mumbai for pandharpur with wife rashmi thackeray in heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.