शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी इन्फोसिस फाऊंडेशनची 'आशा' धर्मशाळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:41 IST

Infosys Foundation's 'Asha' Dharamshala : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीमती सुधा मुर्ती या  महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील 'आई' आज आपल्याला पहायला मिळाली.

मुंबई :  आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली असली तरी टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात आज उद्घाटन होत असलेल्या 'आशा' धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दार देखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या 'आशा' निवास धर्मशाळेच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती  (Sudha Murty) यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोदगार मुख्यमंत्र्यांनी काढले. ( CM Uddhav Thackeray inaugurates Infosys Foundation's 'Asha' Dharamshala for cancer patients at the Tata Memorial Center)

दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्‍या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्यासह नंदन निलकेणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे,  परमाणू  ऊर्जा विभागाचे सचिव के एन व्यास,  सहसचिव संजय कुमार, टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवे, यांच्यासह इन्फोसिस व टाटा मेमोरियल सेंटरचे इतर मान्यवर उपस्थित होते. खारघर येथे बांधण्यात आलेली या  १३ मजली अूसन इमारतीत २६० खोल्या आहेत. 

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीमती सुधा मुर्ती या  महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील 'आई' आज आपल्याला पहायला मिळाली,  सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही, प्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं यास्थितीत श्रीमती मुर्ती यांची दातृत्वाची वृत्ती  विरळ आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे.  जेव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते, तेव्हा नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना देखील त्यांनी जपली.

सहकार्याचे अनमोल हातआपण आज मंदिरे खुली केली आहेत पण यापूर्वीही डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपास, सोबत वावरत होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की उपचारासाठी मुंबईत किंवा मोठ्या शहरात  कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडत नाही मग ते मिळेल तिथे राहातात, त्यांच्यासाठी हा “आशा” निवास  खुप महत्वाचा आधार ठरणार आहे. शासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत आहेच त्यात  टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याच्या हाताने या कामाला अधिक बळकटी मिळते.  मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येणारा रुग्ण खडखडीत बरा होऊन सुखरूप घरी जावो अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली.

अनुभवातून आलेला संदेशश्रीमती सुधा मुर्ती यांची पुस्तके ही केवळ चाळता येत नाहीत तर ती लक्ष देऊन वाचावी लागतात, यात कुठलाही कल्पनाविलास नाही तर अनुभवातून आलेला संदेश आणि विचार आहे, हे विचारधन तुम्ही वाटत आहात असेही मुख्यमंत्र्यांनी सुधा मुर्तींच्या पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले. आशा निवासामुळे गरीब रुग्णांना मदत – सुधा मूर्तीनवी मुंबई-खारघर येथे टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यात आलेल्या आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होईल असे सांगून श्रीमती मूर्ती यांनी  टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचे कौतूक केले.इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचेही सांगितले.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcancerकर्करोगSudha Murtyसुधा मूर्ती