गुरूवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. "या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे," अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.