CM Uddhav Thackeray announced 1 crore for Ram Mandir?; trust said not a money has come yet | राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले १ कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही, ट्रस्टचा दावा

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले १ कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही, ट्रस्टचा दावा

ठळक मुद्देसरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होतेराम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केलीशिवसेनेकडून १ रुपयाही अद्याप आला नाही, ट्रस्टचा दावा

अयोध्या – येत्या ५ ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत पार पडणार आहे, या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साह पाहायला मिळत आहे. भूमीपूजनाची जय्यत तयारी राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे. अशातच शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी घोषित १ कोटी रुपयांपैकी १ रुपयाही पोहचला नाही असं राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत. सध्या राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने महंत गोपाल दास यांच्याशी संवाद साधला त्यात ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांनी दावा केला आहे की, शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या देणगीची जी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती, त्यातील एक रुपयाही ट्रस्टला मिळाला नाही.

मात्र महंताच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी ट्रस्टकडे जमा करण्यात आलेले आहेत. २८ तारखेला ही रक्कम ट्रस्टकडे जमा झाली असा दावा त्यांनी केला आहे. मात्र महंत यांनी राम मंदिर ट्रस्टला पैसे पोहचले नाहीत असं सांगितल्याने ते १ कोटी रुपये कुठे गेले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतले होते, त्यावेळी अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. मार्चमध्ये उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने याठिकाणी जागा दिल्यास महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्याचा मानस असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत महंत गोपालदास म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल, अयोध्येत कुणाला आमंत्रणाची गरज पडत नाही, ज्याची भावना आहे ज्याच प्रेम आहे तो आपोआपा येतो, मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही असा विश्वासही गोपालदास यांनी व्यक्त केला.  

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CM Uddhav Thackeray announced 1 crore for Ram Mandir?; trust said not a money has come yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.