शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

टेक ऑफ आधीच रंगणार सामना; उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 9:48 AM

मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे हे एकाच व्यासपीठावर येणार  असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

मुंबई/सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. केंद्रीय लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री, खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहतील. 

मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे हे एकाच व्यासपीठावर येणार  असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत आपले नाव तिसऱ्या क्रमांकावर, छोट्या अक्षरात असल्याची नाराजी व्यक्त करून राणे यांनी, यावरून राज्य सरकारची संकुचित वृत्ती दिसते अशी टीका केली.  

राजकारण आणि प्रोटोकॉलमध्ये उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा मी सिनियर आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग  जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मीच केला. त्यात शिवसेनेचा काही संबंध नाही. आता लोकार्पण होत असलेल्या चिपी विमानतळाचे कामही मीच केले. शिवसेनेने नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आमचे वैर नाही. त्यांनी जरूर यावे, पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असेही राणे म्हणाले.  

शिवसेनेचा पलटवारराज्य सरकारला प्राेटोकॉल कळतो. नाव आहे हे महत्त्वाचे. छोटे आहे की मोठे याला महत्त्व नसते. काल-परवापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अनादर करून त्यांना बोलविण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणाऱ्यांनी आपले नाव छोटे आहे, अशी तक्रारही करू नये. चिपी विमानसेवेचे स्वागत दिलदारपणे करायला हवे. - खा. अरविंद सावंत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते 

ठाकरे-राणे आज आमने-सामने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वादाचा एक अंक मागील महिन्यात सर्वच देशाने पाहिला. या प्रकारानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते शनिवारी एका व्यासपीठावर येणार असल्याने ते नेमके काय बोलतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे