शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सीएमनी घेतला मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनचा आढावा, अश्विनी भिडे, राधेश्याम मोपलवार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 8:25 PM

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकासकामांचा धडाका लावला आहे.

मुंबईः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकासकामांचा धडाका लावला आहे. तसेच आरे कारशेड रद्द करण्यासारखे काही कठोर निर्णयही त्यांनी घेतले आहेत. आता सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. प्रकल्पांची आवश्यकता, त्यांना लागणारा खर्च, निधीच्या उपलब्धतेसाठी कामांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आज भाजपाच्या काळातील समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्पांच्या स्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे. हे प्रकल्प पुढे कसे जातील, मेट्रोला फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प अधिक वेगानं कसे पूर्ण होतील, यासाठी प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारतो आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये आर्थिक बोजा आहे, तो बोजा परतफेडीसाठी सरकारही भूमिका बजावणार आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत ही आमची भूमिका आहे. याच्यावर मुख्यमंत्री महोदय भाष्य करतील, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज झालेल्या या बैठकीमध्ये सध्या राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत, त्यांची वस्तुस्थिती काय आहे, तसेच या प्रकल्पांसाठी आतापर्यंत किती खर्च झालेला आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. या मुद्द्यांवर बैठकांमध्ये आढावा घेण्यात येणार असून, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. बैठकीला सर्व मंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकांमध्ये मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसह इतर सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.