शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:53 IST

Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय शिंदे समिती रद्द करण्याची मागणीही छगन भुजबळ यांनी केली आहे. यावरून उलटसुलट चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशी स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. छगन भुजबळांच्या या भूमिकेला मराठा समाजातून मोठा विरोध केला जात आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

तीच भूमिका सरकारचीही आहे

कुणब्यांच्या जुन्या नोंदींबाबतचा जीआर आपण काढलेला नाही. १९६७ ते २००४ पासून याच जीआरचा अवलंब केला जात आहे. ज्या ठिकाणी कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते, तिथे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. छगन भुजबळांची एवढीच मागणी आहे की, ओबीसीचे आरक्षण कमी होता कामा नये. तीच भूमिका सरकारचीही आहे. आम्ही ती स्पष्टपणे घेतली आहे. आमची भूमिका कायम आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जुनाट नेत्यांचे (मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता) मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. जुनाट नेत्याचे स्वप्न पूर्ण होऊ न देण्यासाठी मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा, असे आवाहन त्यांनी  केले. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण