शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:02 IST

Maharashtra Political Crisis: संजय राऊतांकडे सापडलेल्या रोख १० लाखांच्या बंडलावर नाव आढळून आल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. यानंतर ईडीने संजय राऊतांना न्यायालयासमोर हजर केले. तेथे दोन्ही बाजूने झालेल्या जोरदार युक्तिवादानंतर संजय राऊत यांना ०४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मात्र, यातच संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांच्या एका बंडलावर एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत हे ईडीला सहकार्य करत नव्हते. यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या ११ लाख रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याचे सांगितले जात आहे. 

ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा

संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईत पैश्यांच्या बंडलवर माझे नाव होते. तर त्याची चौकशी करा. या प्रकरणामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच माझ्या दोन दिवसाच्या दौऱ्यांमध्ये सर्व विभागीय आयुक्तांच्या बैठका होत आहेत. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तातडीने जे प्रश्न सोडवायचे ते सोडवण्यावर भर दिला जात आहे. दौराचा चांगला इम्पॅक्ट लोकांकडून मिळाला आहे. काही निर्णय प्रक्रियेमध्ये थांबले होते, त्याला चालना मिळाली आहे. पुण्यातही अशा प्रकारचा दौरा आहे. यामध्ये पुण्यातील कामाचा आढावा घेणार आहे. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्या आढावा घेतला जाणार आहे. काही कामे प्रालंबित आहेत, त्याच्या लवकरात लवकर निपटारा पूर्ण केला जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला  दिल्याचे समजते. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. एकनाथ शिंदे यांची अयोध्येच्या राम मंदिराला देण्याची ही रक्कम राऊतांनी घरात का ठेवली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे