शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जय जिजाऊ... शिवरायांच्या माऊलीपुढे मुख्यमंत्री नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 5:38 PM

मुख्यमंत्र्यांचं जिजाऊंना वंदन

बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाण्यातील जिजामातांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिजाऊंचं पूजन केलं आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडमध्ये आहे. जिजामाता यांच्या जन्मस्थळाचं आज मुख्यमंत्र्यांनी दर्शन दिलं. 'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे एक महान राजे ज्यांनी आपल्याला दिले, त्या माऊलीपुढे नतमस्तक होताना एक वेगळीच उर्जा प्राप्त होते,' असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'जिजाऊंच्या पुतळ्याला हारार्पण केले आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने विनम्र अभिवादन केले. समाजातील तळागाळातील अंतिम माणसाच्या कल्याणाचा जो मार्ग शिवछत्रपतींनी दाखवला, त्याच मार्गावर आपले सरकार काम करीत आहे,' असेदेखील मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. सिंदखेडा भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजवाडा नुतनीकरणाच्या कामाचं आणि विकास आराखड्याचं भूमिपूजन सुद्धा केले. लखुजीराजे जाधव राजवाडा, सावकारवाडा, काळाकोट, नीळकंठेश्वर मंदिर, चावडी, समाधी, रामेश्वर मंदिर, चांदणी तलावाचा विकास सिंदखेड विकास आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याला दुष्काळाला वारंवार सामोरं जावं लागत आहे. पण सरकार ठामपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे आहे, असं फडणवीस म्हणाले. 'कर्जमाफी, शेतीपंपाला वीज, विहिरी, शेततळांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोठा लाभ दिला जात आहे. एकट्या बुलढाणा जिल्हयात अडीच लाखांवर शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि अखेरच्या पात्र शेतकर्‍यांना लाभ मिळेस्तोवर ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSindkhed Rajaसिंदखेड राजा