एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी सभा टाळली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 23:17 IST2019-08-18T23:17:23+5:302019-08-18T23:17:35+5:30
खडसेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच या यात्रेचा कार्यक्रम आखल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी सभा टाळली!
जळगाव: पूरपरिस्थिती असतानाही प्रचार सुरू असल्याची टीका झाल्याने स्थगित करण्यात आलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ आॅगस्टपासून नंदुरबार येथील सभेने पुन्हा सुरू होत असून २२ रोजी अमळनेरमार्गे जळगाव जिल्ह्यात येत आहे. मात्र आधीच्या दौऱ्यात व आताच्या सुधारीत दौ-यातही माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात सभा टाळण्यात आली आहे.
खडसेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच या यात्रेचा कार्यक्रम आखल्याची चर्चा आहे.
या दौºयात सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्यासह अनेकांचा भाजपप्रवेशाची तयारी सुरु आहे़