शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:58 IST

राज्यात रात्रीचे टॅँकर कुठेही चालू दिले जाणार नाहीत तसेच चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मराठवाड्यात सर्वत्र दिवसभर भारनियमन केले जाते आणि रात्री बेरात्री पाण्याचे टँकर आणले जातात. लोक रात्री दोन-तीन वाजता उठून पाणी भरायला जातात. हे तातडीने थांबवा आणि चारा छावण्यांचे दर ११९ रुपये करा, अशा मागण्या राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. त्यावेळी राज्यात रात्रीचे टॅँकर कुठेही चालू दिले जाणार नाहीत तसेच चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बुधवारी भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली. बैठकीला अजित पवार, राणा जगजीत सिंह पाटील, दीपक आबा साळुंखे, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दुष्काळाबाबत झालेल्या बैठकीत फळबाग, छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचे योग्य नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरणातील पाणी यासारख्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली.

कोणत्याही गावाची लोकसंख्या गृहीत धरुन २०११ च्या सेन्सेसचा विचार करायचा आणि त्यात १५ टक्के वाढ धरायची म्हणजे आत्ताच्या लोकसंख्येचा अंदाज येतो. तो अंदाज घेऊन प्रत्येकाला माणसी २० लिटर प्रतीदिन पाणी देणे अपेक्षित आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे जनावरांच्या नोंदी आहेत. त्यानुसार मोठ्या जनावरांना ४० व छोट्यांना १५ लिटर पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र सध्या एवढे देखील पाणी दिले जात नाही, असे राणा जगजितसिंह पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा यात तातडीने सुधारणा केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाण्यासाठी तातडीने दिवसाच्या भारनियमनाचे नियोजन करा, तशा सूचना महावितरणला देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिले.

दुधाला प्रती लिटर ३ रुपये वाढून देण्याचा निर्णय प्रलंबित आहे, असे सांगितल्यानंतर ३० एप्रिलपर्यंतचे पैसे तातडीने दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रोजगार हमी योजनेच्या कामात कुशल कामाची बिले अद्याप प्रलंबित आहेत. ती तातडीने द्या, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर केंद्र सरकारने जरी निधी दिला नाही तरी राज्य सरकार स्वनिधीतून ही देणी देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना भरीव मदत गरजेची - पवारफळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे २५ वर्ष मागे जाणे आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति हेक्टर ३५ हजार दिले होते. तितकी रक्कम द्यावी. दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात होणारा घोटाळा थांबवावा, अशी विनंतीही पवारांनी केली. जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्याला देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल, असे पवारांनी सुचवल्यावर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवून घेतो, असे सांगत सकारात्मकता दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर यासंदर्भात केंद्राकडे अधिक मदत मागू, असे आश्वासनही दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळ