शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने जंजिरा पर्यटकांसाठी बंद

By admin | Updated: June 16, 2015 22:36 IST

साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला वास्तुविशारदाचा अजोड नमुना पर्यटकांना भुरळ न घालेल तरच नवल.

मुरुड : साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला वास्तुविशारदाचा अजोड नमुना पर्यटकांना भुरळ न घालेल तरच नवल. येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात, मात्र आता १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मेरी टाइम बोर्डाच्या आदेशानुसार किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे येथे येणाऱ्या उत्साही पर्यटकांमध्ये काहीशी नाराजी आहे.मुरुडपासून पाच किमीवर असलेल्या दंडा राजपुरीच्या दक्षिणेस भर समुद्रात तब्बल २२ एकर जागेत २२ बुरुजांची तटबंदी असलेल्या मूक पहारेदाराने इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि मराठी सत्ताधीशांच्या स्वाऱ्या झेलल्या. परंतु दान पडले ते केवळ हवशी सुलतानच्या पक्षामध्ये. अखेरपर्यंत ते सिद्द्यांकडे राहिले. या रोमहर्षक इतिहासाचे हौशी तथा इतिहास अभ्यासक पर्यटकांना अप्रुप वाटते. जंजिऱ्याच्या उरावर शह देण्यासाठी बांधलेल्या पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला शिवशाहीची दुर्दम्य इच्छाशक्ती व सामर्थ्यशाली झुंजारवृत्तीची जणू साक्ष देतो. सूर्याेदय ते सूर्यास्तापर्यंत हा किल्ला भटकंतीसाठी खुला असतो. प्रदूषणरहित शिडाच्या होड्या जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे तैनात असतात. प्रौढांना रु . २० तर १२ वर्षांच्या आतील मुुलांना १० रु. तिकीट शुल्क आकारण्यात येते. सुमारे १०० माणसांना पाच महिने खात्रीशीर रोजगाराचे साधन उपलब्ध होते. पाकिटातील खाद्यपदार्थ, शीतपेये, नारळपाणी विक्रेते चांगला धंदा करतात. (वार्ताहर)