४८ तासापासून बीडमध्ये रिमझिम पाऊस
By Admin | Updated: September 15, 2016 12:43 IST2016-09-15T12:43:09+5:302016-09-15T12:43:09+5:30
दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने परतीचा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे

४८ तासापासून बीडमध्ये रिमझिम पाऊस
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 15 - दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने परतीचा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यातील नदी आणि ओढ्यातून पाणी वाहू लागले असून सलग ४८ तासापासून बीडकरांना सूर्यदर्शनही झालेले नाही. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस असा अनुभव सध्या लोक घेत आहेत. मोठ्या पतिक्षेनंतर पाऊस होत असल्याने शेतक-यांनाही दिलासा मिळणार आहे. गणेशाच्या विसर्जनाची तयारीही पावसातच सुरू आहे.