सोलापुरातल्या बुधवार पेठेत दोन गटांमध्ये हाणामारी

By Admin | Updated: July 26, 2016 18:41 IST2016-07-26T18:41:02+5:302016-07-26T18:41:02+5:30

मरीआई लक्ष्मी मंदिरात आषाढी महिन्यानिमित्त कोंबडे न कापण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली

Clashes between two groups in Budhwar Peth in Solapur | सोलापुरातल्या बुधवार पेठेत दोन गटांमध्ये हाणामारी

सोलापुरातल्या बुधवार पेठेत दोन गटांमध्ये हाणामारी

ऑनलाइन लोकमत,

सोलापूर, दि. 26 - शहरातल्या बुधवार पेठेतील अस्थी विहारसमोरील मरीआई लक्ष्मी मंदिरात आषाढी महिन्यानिमित्त कोंबडे न कापण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तात्काळ दाखल असून, पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या दगडफेकीत दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले आहेत. यात काही पोलीसही जखमी झाले. हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाडीच्या काचा तसेच अस्थी विहारच्या काचा फोडल्या आहेत. दगडफेकीतील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Clashes between two groups in Budhwar Peth in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.