शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मी काल जे सांगितलं ते फायनल; शिरूर दौऱ्यात अजित पवारांचा पुन्हा कोल्हेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 08:48 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे आमनेसामने

पुणे - Ajit Pawar on Amol Kolhe ( Marathi News ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात पाहणी दौऱ्यासाठी पोहचले.यावेळी मतदारसंघातील विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला.शिरूरमध्ये आम्ही जो उमेदवार देऊ त्याला निवडून आणून दाखवू असं अजितदादांनी म्हटलं होते.त्यानंतर आजच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 

या दौऱ्यात अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या चॅलेंजचा आणि आजच्या दौऱ्याशी काहीही संबंध नाही. अधिवेशन काळातच हा दौरा नियोजित होता. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ, मी जे काही सांगितले ते फायनल आहे असं त्यांनी म्हटलं. 

पुणे दौऱ्यात अजित पवार काय म्हणाले होते?ज्यावेळी अजित पवार चॅलेंज देतो ते जिंकूनच दाखवतो. निकालानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा.राजकारणात कुणी काय करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु शिरूरची जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार असं अजितदादांनी म्हटलं होते. त्यावर खासदार अमोल कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिले. जेव्हा चांगले काम केले तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. त्यामुळे आज जर त्यांनी विरोधात प्रतिक्रिया दिली असेल तर त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही. ५ वर्षात मतदारसंघातील हजेरीबाबत बोलले असतील तर त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता.त्यावेळी कान धरला असता तर नक्कीच सुधारणा केली असती. आता अजितदादांनी कान धरलाय त्यामुळे यापुढच्या काळात मी सुधारणा करेन. तसेच जनता सुज्ञ असून सत्तेच्या बाजूने राहायचे की, तत्वे, मूल्ये यांना आपण पाठिंबा द्यायचा हे जनता ठरवेल असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, अजित पवारांनी शिरूरवर भाष्य केल्यानंतर त्यांचे निष्ठावंत विलास लांडे यांनीही उमेदवारीसाठी शड्डू ठोकला. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्याबाबत अजितदादांनी जे सांगितले, राष्ट्रवादीचा खासदार तिथे निवडून येईल. त्यामुळे १०० टक्के तो शब्द खरा ठरणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अजितदादांच्या पाठिशी उभे राहतील. माझी देखील या लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची तयारी आहे असंही माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूर