सीआयडीनेही घेतली शिवाजीनगर पुुलाबाबत माहिती
By Admin | Updated: August 5, 2016 17:14 IST2016-08-05T17:14:12+5:302016-08-05T17:14:12+5:30
महाड येथील पूल दुर्घटनेनंतर शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील सर्व धोकादायक पुलांबाबत माहिती मागविली असली तरीही

सीआयडीनेही घेतली शिवाजीनगर पुुलाबाबत माहिती
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ : महाड येथील पूल दुर्घटनेनंतर शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील सर्व धोकादायक पुलांबाबत माहिती मागविली असली तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीत मनपा हद्दीतील १०३ वर्ष जुन्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचा उल्लेख नाही. मात्र शासनाने सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) मार्फतही माहिती मागविलेली असल्याने सीआयडीच्या सहायक आयुक्तांनी गुरूवारी मनपात येऊन या पुलाबाबत माहिती घेतली. यासंदर्भात मनपाने शासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती त्यांना देण्यात आली. खासदारांकडे ठराव पाठवून व शासनाकडे पत्रव्यवहार करून वर्षभराचा कालावधी उलटूनही दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली.
राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला
आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलांचे काम करण्यासंदर्भातील प्रस्ताव मनपाने राज्य शासनाला पाठविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजुरी मिळाली की मनपा हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून ते काम केले जाईल. त्यानंतर पुन्हा हे पूल देखभाल, दुरुस्तीसाठी मनपाकडे वर्ग केले जातील, असेही महापौरांनीसांगितले.