शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर औरंगाबादला मिळाले पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद सांभाळणार धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 15:59 IST

नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबादनांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचेपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. मागील आठवड्यापासूनच त्यांच्या नियुक्तीवर सोशल मीडियात चर्चा सुरू होती. आज त्यांना नियुक्ती पत्र मिळाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे परिस्थिती काहीशी बिघडत चालली होती. 11 मे रोजी औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला तात्काळ पोलीस आयुक्त द्या, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री आज चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. 

मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?

कचऱ्याच्या प्रश्नांवरून मिटमिटा येथे मार्च महिन्यात झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तेव्हापासून शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे काम पाहत आहेत. अत्यंत संवेदनशील औरंगाबाद शहरात जानेवारीपासून आतापर्यंत चार दंगली झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवरील लुटमार, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली. ‘मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी’? या मथळ्याखाली लोकमतने १८ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन शासनाने पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती केली. 

औरंगाबादमध्ये कामाचा आहे अनुभव प्रसाद हे १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  म्हणून त्यांनी २००२ मध्ये काम केले, नंतर त्यांची बदली जालना पोलीस अधीक्षकपदी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय पोलीस दलातही त्यांनी विशेष कामगिरी केली. बिहार आणि छत्तीसगडमध्ये राबविण्यात आलेल्या अ‍ॅन्टी नक्षल आॅपरेशनचे ते प्रमुख होते. दोन वर्षांपासून ते नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस