शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार तर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 5:55 PM

संध्याकाळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला जोरदार धडक दिली. ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहूटीमधून वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले.

ठळक मुद्देताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. मेंढपाळ कुटुंबियांना शासकिय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि.२१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शीर आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहूटीमधून वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. यानंतर गावातील नागरिकांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला; मात्र मुलगा आढळून आला नाही. दरम्यान, सकाळी काही लोक जंगलात शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलाचे शीर मिळून आले. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. या भागात तत्काळ पिंजरे लावण्यात येणार असून मेंढपाळ कुटुंबियांना शासकिय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा नाशिक-पुणे महामार्गावर मृत्यू तसेच दुसर्‍या घटनेत संध्याकाळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे साडेतीन वर्षांचा नर जातीचा बिबट्या या अपघातात मृत पावला. यावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वनविभागाचे अधिकार्‍यानी तातडीने घटनास्थळ गाठले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनपाल अनिल साळवे, प्रितेश सरोदे, पोपट बिन्नर आदिंनी स्पॉट पंचनामा केला. आज सकाळी पशुवैद्यकिय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून वनविभागाच्या कर्मचार्‍यानी मोहदरी वनोद्यानात मृत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निफाडला बिबट्या जेरबंदनिफाड तालुक्यातील शिवरे गावात धुमाकूळ घालणार्‍या नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार तर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. शिवरे गावातील बाजीराव सानप यांच्या शेतात लावलेल्या पिंजºयात पाच वर्षांचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. सदर माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, दत्तू आहेर आदिंनी पिंजरा ताब्यात घेतला. सुरक्षितरित्या पिंजरा निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आला.