वडिलांच्या मारहाणीला भिऊन मुलाची आत्महत्या

By Admin | Updated: August 23, 2016 14:49 IST2016-08-23T14:48:06+5:302016-08-23T14:49:32+5:30

वडीलांच्या मारहाणीला भिऊन एका शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील देवकरा घटना घडली.

Child's Boyfriend's Suicide Behind the Marriage | वडिलांच्या मारहाणीला भिऊन मुलाची आत्महत्या

वडिलांच्या मारहाणीला भिऊन मुलाची आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
किनगाव, दि. २३ - अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथे एका शाळकरी मुलाने वडीलांच्या मारहाणीला भिऊन विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली़
देवकरा येथील सुमित नाथराव उर्फ बालाजी गुट्टे (१२) हा विद्यार्थी देवकरा पाटील येथील संत भगवानबाबा विद्यालयात सहावी वर्गात शिकत होता़ नाथराव यांना शेती नसून मोल मजुरीवरच कुटुंबाची उपजिवीका भागवितात़ पण त्यांना दारुचे व्यसन जडले असल्याने पत्नीच्या मोल मजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो़ आईने मोलमजूरी करून घरात आणून ठेवलेले रुपये हे वडील नाथराव चोरून घेत असताना सुमित ने पाहीले़ वडील रागावून मारतील या भितीपोटी तो शनिवारी दुपारपासूनच गायब होता़ त्याचा शोध घेतला असता मंगळवारी गावच्या शेजारी गावापासून ३०० फुट अंतरावर असलेल्या बबन फड यांच्या विहीरीत सुमितचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला़ या प्रकरणी मुलाचे मामा दत्तात्रय सटवाजी दहिफळे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्याचा अधिक तपास पोहेकॉ व्यंकट रोकडे हे करीत आहेत़

Web Title: Child's Boyfriend's Suicide Behind the Marriage