शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचं अनुकरण भोवलं, गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 06:27 IST2017-09-04T03:51:13+5:302017-09-04T06:27:08+5:30
गणेशोत्सव मंडळाने केलेला दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचे अनुकरण करताना गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचं अनुकरण भोवलं, गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू
पुसेसावळी (जि. सातारा): गणेशोत्सव मंडळाने केलेला दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचे अनुकरण करताना गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी वडगाव येथे घडली. सुमित प्रमोद शिंदे (१३, रा. गोरेगाव वांगी, ता. खटाव) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
वडगाव येथील जयरामस्वामी विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये सुमित शिकत होता. शनिवारी दुपारी तो दिवसभर गावातील गणेश मंडळाजवळ अन्य मुलांसोबत खेळत होता. संबंधित गणेश मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकºयांवर देखावा केला आहे. शेतकरी आत्महत्येचा जिवंत देखावा मंडळाचे कार्यकर्ते सादर करीत आहेत. शनिवारी सायंकाळी सुमीत शेतावरून घरी आल्यानंतर देखाव्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याला प्रत्यक्षात गळफास लागला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने कºहाड येथील रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देखाव्याचे अनुकरण करताना मुलाचा मृत्यू झाल्याने गावात, कुटुंबियात व त्याच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहेत़ अशा प्रकारे मृत्यू कोणावरही ओढवू नये, अशा शब्दांत सर्व दु:ख व्यक्त करत आहेत़