बालक-माता मृत्यू ही बाब चिंताजनक !
By Admin | Updated: October 26, 2014 02:13 IST2014-10-26T02:13:00+5:302014-10-26T02:13:00+5:30
बालमृत्यू, मातामृत्यू हे प्रकार केवळ चिंताजनकच नाहीत, तर लज्जास्पदही आहेत.

बालक-माता मृत्यू ही बाब चिंताजनक !
मुंबई : बालमृत्यू, मातामृत्यू हे प्रकार केवळ चिंताजनकच नाहीत, तर लज्जास्पदही आहेत. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या अभावामुळे अनेक माता आणि बालकांना जीव गमावावा लागतो. गरिबातील गरीब व्यक्तीला देखील माफक दरात प्राथमिक आरोग्यसेवा मिळवून देण्यास समाज आणि सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
एखादा मुलगा बोअरवेलमध्ये पडला, तर तो जिवंत बाहेर येईर्पयत सर्वच जण टीव्ही पाहात राहतात; त्यांना अस्वस्थ वाटते. मात्र प्राथमिक आरोग्यसेवेच्या अभावामुळे होणा:या बालमृत्यूंचे गांभीर्य जनतेर्पयत पोहोचतच नाही. याविषयी समाजात जनजागृती करणो गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रत गेल्या काही वर्षात बदल होत आहेत, मात्र अजूनही उपचारांसाठी परदेशात तयार झालेली उपकरणोच वापरण्यात येतात. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत उपकरणांची निर्मिती आपल्या देशात करणो ही काळाची गरज आहे. असे झाल्यास ही उपकरणो देशातील दुर्गम भागात देखील सहज उपलब्ध करून देणो शक्य होईल, असेही मोदी म्हणाले.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टेलीमेडिसीनचा वापर झाला पाहिजे. ‘डिजिटल इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत टेलीमेडिसीनद्वारे दुर्गम भागात आधुनिक वैद्यकीय सेवा पुरवता याव्यात आणि गरिबांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यामुळे दुर्गम भागातील जनताविकास प्रक्रियेशी जोडली जाईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय क्षेत्रत स्पेशलायङोशनचे प्रमाण वाढले आहे. भारतातील डॉक्टरांच्या अनुभवाची महती परदेशात देखील आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याबाबतच्या आपल्या सूचनेबद्दल ते म्हणाले, जगभरात पवित्र आरोग्य सेवा हा चर्चेचा विषय आहे.
भारत देखील यात आपले योगदान देऊ शकतो. खरा नेता गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी काम करतो, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आरोग्यसेवेतील कार्याबद्दल फाउंडेशनचे अभिनंदन केले.
मुकेश अंबानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, वरिष्ठ नेते विनोद तावडे, राज्यसभा खासदार परिमल नाथवानी तसेच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, आशा भोसले हे हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, सुनील गावसकर आदी उपस्थित होते. खासदार परेश रावल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा
आजाराचे निदान झाल्यानंतर उपचार महाग पडतात. मात्र प्रतिबंधात्मक उपचार खर्चिक नाहीत. उपचारांवरचा खर्च कमी व्हावा, म्हणून विमा काढला जातो. पण प्रतिबंधात्मक उपचारांकडे लक्ष देणोही गरजेचे आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी हा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा मोठा स्नेत आहे, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात राबवलेल्या ‘हात धुवा’ या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा
रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी स्वागतपर भाषणात रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. 3 लाख रुग्णांना लाभ मिळून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम रुग्णालयाने आखला आहे. अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया आणि अन्य विकसित देशांमधील भारतीय वंशाचे 5क् डॉक्टर्स देशाच्या सेवेसाठी भारतात परतल्याची माहिती त्यांनी दिली.
आजाराचे निदान झाल्यानंतर त्यावरील उपचार महाग पडतात. मात्र हे पैसे खर्च करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपचार करणो जास्त योग्य आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात उपचारासाठी आता टेलीमेडिसीनचा वापर झाला पाहिजे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान