आईस्क्रीमचे आमिष दाखवून बालिके वर अत्याचार

By Admin | Updated: May 12, 2017 03:17 IST2017-05-12T03:16:15+5:302017-05-12T03:17:27+5:30

आईस्क्रीमचे आमिष दाखवून एका चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे

Child abuse by showcasing ice cream | आईस्क्रीमचे आमिष दाखवून बालिके वर अत्याचार

आईस्क्रीमचे आमिष दाखवून बालिके वर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आईस्क्रीमचे आमिष दाखवून एका चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे संतप्त महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
सिन्नरफाटा भागात राहणारा व्यापारी संशयित सुभाष झवर (५१) याने शेजारील एका बालिकेला घरात बोलावून आइस्क्रीमचे आमिष दाखविले. घराचा दरवाजा बंद करून घेत तिचे लैंगिक शोषण करीत अत्याचार केले. झवर यास अटक केली असून, त्याच्यावर बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Child abuse by showcasing ice cream