शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

चिखली जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 20:14 IST

स्वाभिमानीचा आक्रमक पावित्रा

चिखली : मागील वर्षी शेतकऱ्यांनी विकलेल्या उडीद, मूग, हरभरा व तुरीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार आंदोलने करून हा प्रश्न लावून धरला होता. मात्र, त्याउपरही शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक जानेवारीला चिखली जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.

नाफेडची सब एजंन्सी म्हणून चिखली जिनिंग प्रेसिंगची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन व विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने चिखली येथे शेतकऱ्यांच्या उडीद, मूग, तूर, हरभरा खरेदी करण्यात आला होता. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात विकलेल्या उडीदाचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तर गत मार्च महिन्यात खरेदी केलेल्या तुरीचे व हरभऱ्याचे पैसेसुध्दा अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. हा पैसा देण्यास चिखली जिनिंग प्रेसिंग एक वर्षापासून चालढकल करीत आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देवून तसेच आंदोलने करून सुध्दा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. या उलट पैसे न देता तुमचा माल घेवून जा, अशा धमक्या शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या. ज्या शेतकऱ्यांनी आपला माल नेला त्यांना सुध्दा चांगला माल घेवून निकृष्ठ दर्जाचा माल दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला होता. 

याशिवाय तुरीची नोंदणी करून सुध्दा ऑनलाईन ऑफलाईनच्या घोळामध्ये माल घेतला नाही. शासनाने जाहीर केलेले अनुदान देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. या सर्व प्रकाराला केवळ चिखली जिनिंग प्रेसिंग संस्था जबाबदार असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुध्दा या संस्थेविरूध्द कोणतीही कारवाई होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली जिनिंग कार्यालयावर जावून कार्यालय पेटवून दिले. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळ पासूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हयात स्वाभिमानी आक्रमकपणे रस्त्यावर उतरली होती. त्यात, चिखलीत कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयच पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान,  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होती.

टॅग्स :chikhali roadचिखली रोडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना