शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ हेलीकॉप्टर बिघडले होते साताऱ्यातही!

By admin | Updated: May 25, 2017 23:13 IST

मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ हेलीकॉप्टर बिघडले होते साताऱ्यातही!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लातूर येथे अपघात झालेले हेच हेलीकॉप्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यावेळीही बिघडले होते. मात्र तात्पुरती दुरूस्ती करून पुन्हा या हेलीकॉप्टरने टेकआॅफ घेतले. त्याचवेळी या बिघडलेल्या हेलीकॉप्टरच्या बाबतीत संबंधित प्रशासनाने सतर्कता बाळगली असतीतर निलंग्यातील घटना घडली नसती, अशीही चर्चा जिल्ह्यात रंगली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवार दि. १८ रोजी हेलीकॉप्टरने साताऱ्यात आले होते. नेहमी सैनिक स्कूलच्या पटांगणावर उतरणारे हे हेलीकॉप्टर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानंतर प्रथमच पोलिस परेड ग्राऊंडवर उतरविले गेले. कारण सैनिक स्कूल पटांगणावरील हेलिपॅडला आजूबाजूच्या वस्तंूचा अडथळा होऊ शकतो, हे पोलिस खात्याने ओळखले होते. शुक्रवारी सकाळी पायलटने हेलीकॉप्टरची तपासणी केली असता त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. सुमारे पाच ते सहा वेळा हेलिकॉप्टर दुरूस्त करण्यासाठी सुरूही करण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दुरूस्ती करण्याचे कामकाज सुरू झाले. दरम्यान कालावधीत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारने सातारा जिल्ह्याचा उर्वरित दौरा केला.दुपारी दुरूस्त झाल्यानंतरच हेलीकॉप्टर सांगलीकडे रवाना झाले होते. मात्र हेलीकॉप्टरने टेकआॅफ घेतल्यानंतर सर्वजण चिंतेत होते. मुख्यमंत्री सांगलीत पोहोचेपर्यंत पोलिस यंत्रणा त्यांच्या टीमशी संपर्क ठेवून होती. सायंकाळी मुख्यमंत्री सांगलीत पोहोचल्यानंतर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला होता.जिल्ह्यातील हितचिंतकांचा मुख्यमंत्र्यांशी संवादनिलंगा येथील घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हितचिंतक अतुलबाबा भोसले तसेच दीपक पवार यांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मोबाईल दुर्घटनाग्रस्त हेलीकॉप्टरमध्ये हरवल्यामुळे त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.