मुख्यमंत्री डिनरसाठी 'मातोश्री'वर, राजकीय वर्तुळात खळबळ

By Admin | Updated: July 17, 2016 23:34 IST2016-07-17T23:34:26+5:302016-07-17T23:34:26+5:30

विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिनरसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

Chief Minister's dinner for 'Matoshree', excitement in the political circle | मुख्यमंत्री डिनरसाठी 'मातोश्री'वर, राजकीय वर्तुळात खळबळ

मुख्यमंत्री डिनरसाठी 'मातोश्री'वर, राजकीय वर्तुळात खळबळ

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिनरसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मातोश्रीच्या डिनर टेबलवर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा रंगणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमधलं शीतयुद्ध सगळ्यांनाच माहिती आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी परस्परविरोधी वक्तव्य करून राजकीय वातावरण चांगलंच गरम केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जेवणासाठी मातोश्रीवर गेल्यामुळं सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत.

Web Title: Chief Minister's dinner for 'Matoshree', excitement in the political circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.