शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी लबाड बोलल्याचे जाहीर करावे

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

हसन मुश्रीफ : कोल्हापुरातील टोलप्रश्नी भाजप सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘कोल्हापूर टोलमुक्त करू,’ ही घोषणा केवळ सत्तेवर येण्यासाठी केली होती. ते निवडणुकीतील वक्तव्य होते, आपण लबाड बोलल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे. कोल्हापूरची जनता त्यांना माफ करेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने ‘एम. एच. ०९’ चा प्रस्ताव दिला होता. संपूर्ण टोलमाफीतील अडचणी आम्हाला माहिती होत्या, पण त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील, राजेश क्षीरसागर व टोलविरोधी कृती समितीने अमान्य केले. त्याचा फटका आम्हाला बसला, जनतेने आम्हाला घरी बसविले. हे सगळे माहिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही. मग विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली काय? हे कोल्हापूरच्या जनतेसमोर जाहीर करून माफी मागावी.राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरावेळी आमच्या मंत्र्यांना याच टोलविरोधी कृती समितीने काळे झेंडे दाखवले होते तर शिवसेनेने आमचे श्राद्धही घातले होते. त्यावेळी हेच चंद्रकांतदादा पाटील व राजेश क्षीरसागर पुढे होते. आता त्यांची भाषा कशी बदलली, असा सवालही त्यांनी केला. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एका विधानसभा निवडणुकीत शेतीपंपाची वीज बिले माफ करण्याची घोेषणा केली होती. त्यानंतर त्यांनी हे निवडणुकीतील भाषण असल्याचे जाहीर सांगितले होते. जनतेने त्यांना माफ करून पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. टोलविरोधी कृती समिती याबाबत काय भूमिका घेते त्यावर ‘उद्या बोलू’, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.बिंदू चौकात भाषण दाखवूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण नसेल तर त्यांनी केलेल्या भाषणाची सीडी बिंदू चौकासह कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौकात लावू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ...अन् डोहाळे जेवणसरकारने टोलमुक्तीचे आश्वासन देऊन सात महिने उलटले. त्यामुळे टोलबाबत काय भूमिका घेणार आहे, हे जनतेला सांगा. कारण आता डोहाळे जेवणाची वेळ झाल्याची बोचरी टीकाही आमदार मुश्रीफ यांनी केली.