शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेचं ठरलं?; मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:28 IST

मुख्यमंत्रिपदाचे गुपित कायम

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलंय’ असे सांगत ते गुपित कायम ठेवले. तर उद्धव यांनी ‘सगळे समसमान असले पाहिजे’ असे सांगून मुख्यमंत्रिपदावर आपला दावा कायम ठेवला.शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. युतीमध्ये मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेणार, पाचही वर्षे ते भाजपलाच मिळणार, अशा चर्चा होत आहेत. त्यावर ठाकरे व फडणवीस यांनी कोणताही खुलासा केला नाही. मीडियाला रोज चर्चा हवी असते. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, आमचे सगळेच ठरले आहे, योग्य वेळी जाहीर करू. तुम्ही युतीच्या विजयासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तर ‘मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय, कोणी चिंता करू नका,’ असे उद्धवही म्हणाले.‘माझे मोठे बंधू,’ असा उद्धव यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. भाजप-शिवसेना एकत्र आहेत आणि राहतील. वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचे हे सांगावे लागत नाही. ५६ पक्ष असोत की १५६ पक्ष असोत, जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ नाही, आता आपल्याला साथ-साथ दौडायचे आहे. आमच्यात आता कोणतेही मतभेद नाहीत. युती करतानाच ते आम्ही संपविलेले आहेत. दुरावा नाहीसा झाला आहे, या शब्दात उद्धव यांनी प्रतिसाद दिला. युतीसाठी आज मैदान साफ आहे. पण मैदान साफ असले की पायात पाय अडकून पडण्याची भीती अधिक असते असा इशारा उद्धव यांनी दिला. अयोध्येत राममंदिर होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एमआयएमचे ओवेसी यांच्यावर टीका करताना त्यांनी तुम्ही स्वत:ला देशाचे भागिदार म्हणवता तर वंदे मातरम म्हणायची लाज का वाटते, असा सवालही केला.यावेळी मंचावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार उपस्थित होते.शिवसेनेचे १८ खासदार, सातारामध्ये साडेचार लाखांवर मते घेणारे नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिरुरमध्ये पराभूत झालेले शिवाजीराव आढळराव पाटील महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले.एका युतीची पुढची गोष्ट !उद्धव आणि फडणवीस यांचे भाषण हे तुझ्या गळा, माझ्या गळा’ स्वरूपाचे होते. शिवसेना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, वर्धिष्णू व्हावी, अशी शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिली. एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक दाखवणार होतो पण आता एका युतीची पुढची गोष्ट ठरली आहे, असे उद्धव म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना