मुख्यमंत्री आज सोलापूर दौºयावर; प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:04 AM2019-07-11T10:04:03+5:302019-07-11T10:06:51+5:30

सोलापूर महापालिका परिवहन कर्मचाºयांचा थकीत वेतनप्रश्नी प्रहार संघटना आक्रमक

Chief Minister visits Solapur today; Pahar organization to protect Chief Minister? | मुख्यमंत्री आज सोलापूर दौºयावर; प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार ?

मुख्यमंत्री आज सोलापूर दौºयावर; प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार ?

Next
ठळक मुद्देपरिवहनच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठकमहापालिका परिवहन विभागाच्या कर्मचाºयांचे १४ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे सोमवारपासून जुळे सोलापुरातील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू

सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्या शिष्टाईनंतर वेतनासाठी परिवहन कर्मचाºयांचा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला संप बुधवारी रात्री मागे घेण्यात आला. गुरुवारी एक वेतन आणि २५ जुलै रोजी दुसरे थकित वेतन देण्याचे आयुक्त दीपक तावरे यांनी मान्य केल्यावर आंदोलकांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौºयावर आल्यास त्यांचा ताफा अडविण्यावर ठाम असल्याचे जमीर शेख, अजित कुलकर्णी यांनी सांगितले.

महापालिका परिवहन विभागाच्या कर्मचाºयांचे १४ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे सोमवारपासून जुळे सोलापुरातील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. गेले दोन दिवस आंदोलक टाकीवर मुक्कामास आहेत. सभा संपल्यावर पुन्हा चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले. सभा संपल्यावर महापौरांनी आंदोलकांबरोबर बैठक घेतली. बैठकीस आयुक्त दीपक तावरे, परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, रियाज खरादी उपस्थित होते.

आयुक्त तावरे यांनी गुरुवारी परिवहन कर्मचाºयांना एक महिन्याचे वेतन अदा करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. दुसरे वेतन २५ जुलैपर्यंत देण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन दिले. त्यावर आंदोलकांनी माघार घेत असल्याचे घोषित केले, पण परिवहन कर्मचाºयांचे वेतन दरमहा होण्यासाठी शासनाकडून मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौºयावर आल्यास त्यांचा ताफा अडविण्यावर ठाम असल्याचे जमीर शेख, अजित कुलकर्णी यांनी सांगितले. परिवहनच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

Web Title: Chief Minister visits Solapur today; Pahar organization to protect Chief Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.