CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वाजता संवाद साधणार, राजीनामा देणार की कार्यकर्त्यांना धीर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:42 IST2022-06-22T16:42:08+5:302022-06-22T16:42:34+5:30
मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागलंय सर्वांचं लक्ष.

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वाजता संवाद साधणार, राजीनामा देणार की कार्यकर्त्यांना धीर?
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. तर एकनाथ शिंदे आता कोणती भूमिका घेतायत याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी ५ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 22, 2022
यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील एक सूचक ट्वीट केलं होतं. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत यांनी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू असून ते परत येतील असा दावा केला होता. पण त्यानंतर त्यांनी हे खळबळजनक ट्वीट केलं होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.