अर्थसंकल्पासंदर्भात अर्थमंत्री भेटणार उद्योगप्रमुखांना
By Admin | Updated: June 3, 2014 23:20 IST2014-06-03T23:20:04+5:302014-06-03T23:20:04+5:30
निवडणुकांमुळे मावळत्या सरकारने लेखानुदान सादर केले होते. मात्र, आता नवीन सरकारने कामकाज सुरू केल्यानंतर सर्वप्रथम त्यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.

अर्थसंकल्पासंदर्भात अर्थमंत्री भेटणार उद्योगप्रमुखांना
>नवी दिल्ली : निवडणुकांमुळे मावळत्या सरकारने लेखानुदान सादर केले होते. मात्र, आता नवीन सरकारने कामकाज सुरू केल्यानंतर सर्वप्रथम त्यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.
या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कामकाजास सुरुवात केली असून, येत्या 6 जून रोजी विविध औद्योगिक संघटना आणि प्रमुख उद्योगपती यांची ते भेट घेणार असून अर्थसंकल्पाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणार आहेत.
जुलै महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याचे संकेत सरकारने दिले असून, दुस:या पंधरवडय़ात अर्थसंकल्प मांडण्यात येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
प्राप्तिकर आणि अप्रत्यक्षकरासंदर्भात उद्योगजगताच्या काय मागण्या आहेत, अथवा कोणत्या क्षेत्रचे प्रोत्साहन देण्याची गरज आहे या आणि अशा मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)