शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुख्यमंत्र्यांचीच केली फसवणूक! स्टॉप पेमेंट व चेक बाउन्सचे प्रकार  

By अतुल कुलकर्णी | Published: December 01, 2017 6:29 AM

गरजूंना, गोरगरिबांना, आजारी तसेच संकटात सापडलेल्यांना मदत मिळावी या हेतूने सुरू असलेल्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दिलेले चेक बाउन्स करून मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केली आहे.

मुंबई : गरजूंना, गोरगरिबांना, आजारी तसेच संकटात सापडलेल्यांना मदत मिळावी या हेतूने सुरू असलेल्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दिलेले चेक बाउन्स करून मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केली आहे.चेक बाउन्सच्या यादीत भाजपाचे मोहित कुंभोज यांचा १,११,१११ रुपयांचा, संजय केळकर यांचा ११ हजारांचा, वसंत गाडेकर यांचा १० लाखांचा व संभाजी कर्डिले यांच्या ११ हजारांच्या चेकचा समावेश आहे.कांताबेन रसिकलाल शहा ट्रस्टने दिलेल्या ५१ लाखांच्या चेकचे ‘स्टॉप पेमेंट’ केले. त्याची विचारणा केल्यानंतरच त्यांनी नवा चेक दिला. शहा ट्रस्टने दुष्काळ निवारणासाठी ५१ लाख रुपये दिले होते. नवा चेक वटला तरी आधी स्टॉप पेमेंट का केले, हा प्रश्न कायम आहे. तसेचमुख्यमंत्री कार्यालयाने हे लक्षात आणून दिल्यावरच ट्रस्टने नवा चेक दिला. हे करण्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाºयांना मनस्ताप झाला.अनेक सरकारी कार्यालयांचे चेकही बाउन्स झाले आहेत. अन्वेषण विभागाचे कर सहआयुक्त यांचा १,६५,८९८ रुपयांचा, मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा ७७,८४७ रुपयांचा, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयाचा २९,१७६, कारागृह उपमहानिरीक्षक यांचा १६,७९० रुपयांचा चेकही बाउन्स झाला आहे.२७२ कोटी रुपये खर्चमुख्यमंत्री कार्यालयात जलयुक्त शिवार, दुष्काळ निवारण निधी, शेतकरी साहाय्यता निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधी अशी चार खाती आहेत. त्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या काळात ४०५ कोटी ९३ लाख ५८ हजार ४४० रुपये जमा झाले.ज्यातून २३७ कोटी रुपये वैद्यकीय मदतीसाठी,३३ कोटी दुष्काळ निवारणासाठी तर १.७९ कोटी अपघाती मृत्यू व कृत्रिम अवयवरोपणासाठी खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.शंका घेणे योग्य नाहीसामाजिक कार्यासाठी मदत करणाºयांच्या हेतूवर शंका घेणे योग्य नाही. पण चेक बाउन्स झाले ही वस्तुस्थिती आहे. दानशूरांच्या मदतीमुळे अनेक गरजूंना मदत होते. चेक बाउन्स झाल्यास आम्ही स्मरणपत्र पाठवतो. पण ही स्वेच्छेने दिलेली मदत असल्याने कोणावर कायदेशीर कारवाईचा प्रश्न येत नाही.- मुख्यमंत्रीकार्यालयफोटो काढून घेण्यापुरते चेक दिलेल्यांवर कारवाई करावीमाहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती गोळा केली. ते म्हणाले, ही तर चक्क मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक आहे. फोटो काढून घेण्यापुरते चेक दिलेल्यांवर कारवाई करावी व मुख्यमंत्र्यांनी डिजिटल पद्धतीने देणग्या घ्याव्यात, असेही ते म्हणाले.नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला ११ लाखांचा चेकही अ‍ॅडव्हाईस न मिळाल्याने परत गेला. सहायक लेखा अधिकारी या नावाने दिेलेला ४,९८,२८० रुपयांचा चेकही परत गेला. माणगावच्या इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर सायन्स कॉलेजचे प्रा. एस.एस. निकम यांचा १,३५,००० रुपयांचा चेकही वटला नाही. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार