शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीच नजरकैदेत!- अशोक चव्हाण; राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 00:56 IST

वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांना सामाजिक नजरबंदीत तोंड लपवून फिरावे लागते आहे. मला झेड प्लस सुरक्षा आहे, अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री या झेड प्लस सुरक्षेमध्येच अडकले आहेत.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री आठवडाभरापासून मराठा आंदोलनाच्या भीतीने घराबाहेर पडायला घाबरत आहेत. राज्याचे प्रमुख असणारे मुख्यमंत्रीच नजरकैदेत असतील तर सरकार चालणार कसे, असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.चव्हाण म्हणाले की, वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांना सामाजिक नजरबंदीत तोंड लपवून फिरावे लागते आहे. मला झेड प्लस सुरक्षा आहे, अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री या झेड प्लस सुरक्षेमध्येच अडकले आहेत. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी तत्काळ अधिवेशन बोलवावे, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन केव्हा बोलावणार हे सरकारने स्पष्ट करावे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त होण्याच्या कालावधीबाबत सत्ताधारी पक्षाचे विविध नेते वेगवेगळा कालावधी सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली तेव्हा आयोगाच्या अध्यक्षांनी अहवाल द्यायला किमान तीन महिने लागतील, असे सांगितले आहे. त्यामुळे सरकारकडून आरक्षणाबद्दल जो कालावधी सांगितला त्यातून जनतेचीदिशाभूल होत असल्याचे चव्हाण म्हणाले.राज्य मागासवर्गीय आयोगाला माहिती मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु ज्या संस्थांकडून सर्वेक्षण केले जातआहे त्या संस्थांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली जात असल्याचेही चव्हाण म्हणाले.‘१५ आॅगस्टपर्यंत विशेष अधिवेशन बोलवा’मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १५ आॅगस्टला विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. अन्यथा तिसऱ्या आघाडीमध्ये काँग्रेससोबत मिळून भारतीय जनता पार्टी हटावचा नारा देण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.मुळात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका, असे आदेश दिलेले आहेत. मात्र ते अंतिम आदेश नसून घटनेतही ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्यास कोणतीही हरकत दर्शविण्यात आलेली नाही. तिसºया आघाडीतील माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनीही याबाबत ठोस भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच भाजपाने तत्काळ विशेष अधिवेशन घेत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा १५ आॅगस्टनंतर धडक मोर्चा काढण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा