शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 18:47 IST

मुख्यमंत्र्यांना राजकीय भविष्य सांगून ज्योतिषाचा छंदा करायचा असेल तर त्यांनी तो करावा...

ठळक मुद्देवंचित किंवा मनसेला आघाडीत घेण्याबाबतच्या मुद्यालाही त्यांनी दिली बगल आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अद्याप नाही पूर्ण झालेली

पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपाचा संबंध कसा आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांकडूनच वंचितला राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला. तसेच वंचित किंवा मनसेला आघाडीत घेण्याबाबतच्या मुद्यालाही त्यांनी बगल दिली. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे वंचित सोबतच्या आघाडीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे वंचित विकास आघाडीशी आपली खरी लढत असून विधीमंडळातही वंचितच विरोधी पक्ष असेल असे वक्तव्य केले आहे. याविषयी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना राजकीय भविष्य सांगून ज्योतिषाचा छंदा करायचा असेल तर त्यांनी तो करावा. तसेच वंचितला वाढविण्याचे प्रयत्नही करावेत. ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून पक्षांतर करून घेतले जात आहे. विरोधी पक्ष संपवून टाकण्याचे कारस्थान भाजपा आणि आरएसएस करत आहे. लोकशाहीत एकच पक्ष म्हणजे हुकूमशाही असते. तेच त्यांना हवे आहे. अमित शहा यांनी साम, दाम, दंड, भेद ही रणनीती मुख्यमंत्र्यांनी अवलंबिली आहे. पक्षांतर केलेल्या प्रत्येक अडचणीत आहे. त्यांच्या काय अडचणी आहेत, याची माहिती माज्याकडे आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अद्याप पुर्ण झालेली नाही. आघाडी झाल्यानंतर कोणत्या मित्रपक्षाला किती जागा सोडायच्या हे तो पक्ष ठरवेल, असे चव्हाण यांनी सांगितले. मनसेला आघाडीत घेण्याच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. तसेच वंचितशी आघाडीबाबतही त्यांनी भाष्य केले नाही. -----------बेरोजगारी, भ्रष्टाचार प्रमुख मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकºयांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे घेऊन सामोरे जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. अद्याप आघाडी झाली नसली तरी सरकारची धोरणे व अपयशाविरोधात आम्ही पदार्फाश यात्रेच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचत आहोत. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित झालेल्या राज्यांमध्ये चित्र वेगळे दिसले. त्यामुळे मतदार दोन्ही निवडणुकांसाठी वेगळा विचार करतात. महाराष्ट्रतही राज्यातील मुद्यांवरच निवडणुका होतील, असे चव्हाण यांनी नमुद केले.--------

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक