शहरं
Join us  
Trending Stories
1
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
2
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
3
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
4
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
5
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
6
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
7
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
8
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
9
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
10
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
11
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
12
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
13
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
14
Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन
15
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
16
Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
17
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
18
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
19
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
20
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार; टॉक शो, रोड शो आणि नामवंतांच्या गाठीभेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:40 IST

भाजप-शिंदेसेना प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी संयुक्त मेळावा शनिवारी सायंकाळी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील...

मुंबई : सभा, मेळाव्यांना संबोधित करणे ही निवडणूक प्रचाराची परंपरागत पद्धत पण ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:पुरती महापालिका निवडणुकीसाठी बदलणार आहेत. सभा तर ते घेतीलच पण थेट लोकांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रचार करण्यावर ते भर देणार आहेत. 

महापालिकांमधील मतदार हा संपूर्णत: शहरी असतो आणि त्याच्या इच्छा-आकांक्षाही वेगळ्या असतात. त्या समजून घेत त्यावर मुख्यमंत्री म्हणून आपण काय करणार आहोत ते विविध समाजघटकांना भेटून फडणवीस सांगणार आहेत. केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये ते अशा पद्धतीने संवाद साधतील. त्यासाठी ठिकठिकाणी त्यांच्या टॉक शोचे आयोजन भाजपतर्फे करण्यात येणार आहे. काही ठिकाणी त्यांच्या प्रकट मुलाखतींचे कार्यक्रमही होणार आहेत. 

फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत मेळावाभाजप-शिंदेसेना प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी संयुक्त मेळावा शनिवारी सायंकाळी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील. प्रचाराची ही पहिलीच सभा असल्याने उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीबद्दल फडणवीस-शिंदे काय बोलतात याकडे लक्ष असेल.

शहर विकासाचे व्हिजन मांडणार राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभा होतील. तसेच, काही महापालिकांच्या शहरांमध्ये ते रोड शो करणार आहेत. नगर परिषद निवडणुकीत फडणवीस यांनी अगदी पहिल्या प्रचारसभेपासून कोणावरही टीका न करता सकारात्मक प्रचार केला होता. लहान शहरांच्या विकासासाठी आपले विकासाचे व्हिजन त्यांनी मांडले होते.

मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे अनेक ठिकाणी त्यावेळी भाजपच्या विरोधात लढले होते. यावेळीही तीच स्थिती आहे. फडणवीस हे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भाषणे करताना महानगरांच्या विकासाचा अजेंडा मांडणार आहेत. मुंबईत ठाकरे बंधू आणि नागपुरात काँग्रेस मात्र त्याला अपवाद असेल असे म्हटले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis to campaign uniquely: Talk shows, roadshows, meetings with dignitaries.

Web Summary : CM Fadnavis will adopt a unique campaign style for municipal elections, focusing on direct voter contact through talk shows and roadshows. He aims to address urban voters' aspirations, outlining his vision for city development across Maharashtra's major corporations. He will also attend a joint BJP-Shinde Sena meeting.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६