शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 09:41 IST

गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

नवी दिल्ली - मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला तेव्हा आता बोलणारे काय करत होते? मराठी टक्का कुणामुळे कमी झाला? मराठी माणसाला बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, वसई विरारला जायला भाग पाडलं त्याला जबाबदार कोण? फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबईकर जनता यांना धडा शिकवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या २५ वर्षात मुंबईकरांना काय त्रास सहन करावा हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेच्या हातात सगळं काही आहे. कुणाला हरवायचं कुणाला जिंकवायचं हे लोकांना माहिती आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरातील खड्डे समस्या दूर करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेतली. साडे पाच हजार कोटींचे टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोग्य केंद्र, सुशोभिकरण ही कामे मार्गी लावली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता योग्य त्याला मतदान करेल असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमचं सरकार येऊन २ महिने झाले. गेल्या २ वर्षापासून वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु तत्कालीन सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला नाही. परंतु आमच्या सरकारनं प्रयत्न केल्यामुळे सलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचं वेदांताने जाहीर केले. गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे सूड भावनेने, आकसापोटी उद्धव ठाकरे टीका करत आहेत. आज देश महासत्तेकडे चालला आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींवर बोलणे याला जनता उत्तर देईल. दसरा मेळाव्यासाठी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी परवानगी मागितली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिदुत्ववादाचे खरे वारसदार आहोत. त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ. ५० आमदार, १२ खासदार एवढा मोठा निर्णय होत नाही. बोलायला ठीक आहे. त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काहीच शिल्लक नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे