शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 16:33 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. दरम्यान....

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यासोबत कोण जाईल असे वाटत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये सध्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. याबाबत अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ‘पराभवाची समीक्षा करण्यासाठी मित्रपक्षांशी बोलण्याआधी पक्षातील लोकांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत,’ दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा करण्यापूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांशी  चर्चा करत आहोत. असेही चव्हाण यांनी सांगितले.  काँग्रेसने घेतलेल्या या बैठकीत स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सूर लावला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे लोक खाली मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाहीत. उलट राष्ट्रवादीचे लोक भाजपला मदत करतात. त्यामुळे राष्ट्रवाडीबरोबर आघाडी नको, असा सूर बैठकीत उमटला. त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशीही भूमिका मांडण्यात आली.यावेळी अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर टिप्पणी करणे टाळले. संघाचे सर्वच काही घेण्यासारखे नाही, उदाहरण देण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. आम्ही संघाचं अनुकरण करणार नाही. पण चिकाटीने काम करून, असेही  चव्हाण यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा